Sampada Gold Loan
Sampada Banner 2
Sampada Banner 3
Sampada Banner 4

0

एकूण सभासद संख्या

0

एकूण ठेव संकलन

0

कर्ज वितरण

0

ग्रामीण व शहरी भागात

आमची प्रगतीकडे वाटचाल

सन २००० च्या दशकात पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळीने अत्यंत जोर धरलेला असताना, शिरूर तालुका मोठ्या प्रमाणात व्यापार, शिक्षण, औद्योगीकरणाची सुरुवात या कारणामुळे प्रगतीपथावर असताना पतसंस्था चळवळ मात्र शून्यावर होती. व्यवसाय, शिक्षण या कारणामुळे शिरूर शहरात स्थायिक झालेल्या पारनेरकर मंडळीनी आपल्या बांधवांना आर्थिक स्थैर्य देण्यास लाभ होईल यासाठी एकत्र येन्यास एक व्यासपीठ निर्माण होईल या विचाराने पारनेरच्या मातीच शिरूरचं नातं सांगणारी संस्था तत्कालीन सहाय्यक निबंधक गोपाळराव मावळे साहेब यांच्या पुढाकारातून या संस्थेचा जन्म झाला.

मुख्य प्रवर्तक म्हणून अनेक दिग्गज पारनेरकरांचा यात सहभाग होता. त्यात प्रामुख्याने कै. तुकारामजी बेलोटे, कै.भानुदासजी रासकर या सहकारातील अनुभवी व्यक्तींच्या सहभागाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे विश्वनाथजी साळुंके (दादा), शंकररावजी नवले, राजेंद्रजी लोळगे, डॉ राजेराम घावटे (सर), दादाभाऊ कौठकर, शिवाजीराव वराळ, या विविध क्षेत्रात आपापल्या व्यवसायात नैपुण्य असलेल्या व्यक्तींच्या पुढाकारातून दिनांक ०९ नोव्हेंबर २००१ या दिवशी संस्थेची नोंदणी झाली. ही सर्व मंडळी आपापल्या व्यवसायात व्यस्त असल्याने संस्थेला पूर्ण वेळ देऊ शकतील या उद्देशाने बांधकाम व्यवसायातील श्री प्रभाकर हनुमंत डेरे(मामा) यांची मुख्य प्रवर्तक पदी निवड करण्यात आली.

नोंदणीनंतर अवघ्या ३ महिन्याच्या कालावधीतच २६ जानेवारी २००२ मध्ये संस्थेचे शिरूर शहरात कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक २६ जानेवारीला एक शाखा अनुक्रमे जांबुत (२००३-०४), शिक्रापूर (२००४-०५), सविंदणे (२००५-०६) आणि पिंपरखेड (२००६-०७) अशा शाखा सुरू करण्यात आल्या. प्रत्येक वर्षी २६ जानेवारी ला एक शाखा या धोरणानुसार आर्थिक प्रगती सुरू होती. २००७ पासून पतसंस्थांना शाखा उघडण्यावर बंदी घालण्यात आल्याने ५ शाखांच्या माध्यमातून कारभार सुरू होता. दीर्घ काळानंतर कडक निकष पूर्ण करत संस्थेने रांजणगाव गणपती, न्हावरे, आळकुटी, वडगाव रासाई, कवठे यमाई, मलठण व कान्हूर मेसाई, वडझिरे, निघोज आणि राळेगण थेरपाळ या शाखांना मंजुरी मिळवून त्या सुरू केल्या.

या सर्व काळात प्रगतीचा वेग अत्यंत चांगला राहिल्याने संस्थेचे कार्यक्षेत्र शिरूर शहर, शिरूर तालुका, पुणे जिल्हा व यानंतर पुणे, अहमदनगर, ठाणे, रायगड, व बृहन्मुंबई असे विभाग स्तरावर वाढले. याच कालावधीत संस्थेने शंभर कोटी ठेवींचा महत्त्वाचा टप्पा पार करत २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या २५ वर्षाच्या कालावधीत दैनंदिन ठेव प्रतिनिधी व सेवक अशा जवळपास शंभरहून अधिकाना रोजगार देण्याचे काम केले. ठेविदारांचा विश्वास संपादन करत दीर्घकाळ श्री प्रभाकर हनुमंत डेरे, श्री शिवाजीराव वराळ व डॉ. राजेराम प्रभू घावटे यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. अनेक चढ उतार, अनेकांचे योगदान, विश्वास व भक्कम आर्थिक स्थितीच्या जोरावर २५ वर्षाचा इतिहास हा दैदिप्यमान राहिला आहे.

History
अखंड विश्वास
पारदर्शकता
जलद सेवा

या दैदिप्यमान यशामागील खंबीर नेतृत्व

२५ वर्षांच्या या यशस्वी वाटचालीला भक्कम दिशा देणारे आमचे संचालक मंडळ.

संचालक मंडळ पहा →

अध्यक्षांचे मनोगत

डॉ. राजेराम प्रभू घावटे

बी.एस.सी (हॉर्टी), बी.ए., एम.ए. पीएच.डी (अर्थशास्त्र), एम.पी.एम., टी.वी.एम., पी.जी.डी.एस., ए.आय.एम.ए.

अध्यक्ष, संपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर

२५ वर्षाच्या दैदीप्यमान इतिहासानंतर, कोरोना सारख्या महामारीनंतर पतसंस्था चळवळीस लागलेले ग्रहण, आर्थिक परिस्थितीत झालेला अमुलाग्र बदल या पार्श्वभूमी वर संस्थेच्या मुख्य प्रवर्तकांपैकी एक असलेले डॉ. राजेराम प्रभू घावटे यांचे वर असलेली अध्यक्ष पदाची जबाबदारी डॉ. राजेराम प्रभू घावटे सर स्वतःचे अनेक व्यवसाय यशस्वी करण्याबरोबरच, उच्च उच्चशिक्षित सामाजिक जाणीव असलेल नेतृत्व म्हणून या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात अनेक योजना व मोठा दृष्टिकोन ठेवून कार्यरत आहेत. त्यांना संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून अमित ज्ञानदेव गव्हाणे यांचे सह सर्व संचालक मंडळाचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभत आहे.

या रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेची सुसज्ज इमारत, भक्कम आर्थिक स्थिती, सहकारि कायद्याची १००% निकष पूर्तता यावर विशेष भर देत सुलभ व योग्य कर्जवितरणावर भर देऊन कामकाज चालू आहे. रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेच्या ठेवी १०० कोटी च्या पुढे जात असताना ४५% गुंतवणुक हि बँकांमध्ये आहे. म्हणजेच ४५ कोटी बँक बॅलन्स तर कर्ज वाटपात ४० कोटी सोनेतारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जात वाटप, ५ कोटींच्या संस्थेच्या इमारती. अशी जवळपास ९० कोटींची सुरक्षित येणे असलेली संस्थेची स्थिती आहे. संस्था लवकरच क्यू आर कोडद्वारे ग्राहकांशी डिजिटल कलेक्शन द्वारे जोडली जाणार आहे. अनेक नाविन्य पूर्व योजना, विश्वासपूर्वक सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद व विश्वासार्ह सेवा देण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेच्या सुविधा

बचत / ठेव सुविधा

  • बचत ठेव
  • करंट ठेव
  • मुदत ठेव
  • पेन्शन ठेव
  • रिकरिंग ठेव

कर्ज सुविधा

  • वैयक्तिक कर्ज
  • वाहन कर्ज
  • मालमत्ता तारण कर्ज
  • सोनेतारण कर्ज
  • ठेव तारण रोख पत (सी.सी.)

इतर सुविधा

  • चेक क्लिअरिंग
  • फंड ट्रान्सफर ए बी बी
  • NEFT / RTGS
  • वीज बिल भरणा
  • लॉकर सुविधा